Thursday, 16 June 2016

मिशन हरित अजिंक्यतारा

*चला. 'अजिंक्यतारा' किल्ल्याचा*
*डोंगर हिरवागार बनवू या !*🌾🌾

_लोकमत अन् कृषी विभागातर्फे लावणार लाखो बिया_

सातारा : ज्या 'अजिंक्यतारा' किल्ल्यामुळे सातारा शहराला एक वेगळी ऐतिहासिक ओळख निर्माण झाली, त्याचा डोंगर मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे भकास होत चाललाय. सातारा शहर 'ग्रीन सिटी' होणार असतानाच हा डोंगरही चोहो बाजूंने वनराईतून हिरवागार बनविण्याची जबाबदारी प्रत्येक सातारकराची आहे. म्हणूनच 'लोकमत' अन् 'सातारा जिल्हा कृषी विभाग' या दोघांच्या संयुक्त विद्यमाने *'चला.'अजिंक्यतारा'चा डोंगर हिरवागार बनवू या!'* ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

  शुक्रवार, दि. १७ रोजी सकाळी साडेसहा वाजता कुरणेश्‍वर मंदिरासमोरच्या डोंगरावर वेगवेगळ्या वृक्षांच्या बिया लावण्याचा शुभारंभ जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तरी ज्या सातारकरांना *कडुनिंब, करंजे, जांभूळ अन् सीताफळसारख्या झाडांच्या बिया देण्याची इच्छा* आहे, त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, कृषी विभाग, प्रशासकीय इमारत, सातारा बसस्थानकालगत येथे संपर्क साधावा.
......  🌾.....  🌿 ......  🍁......🍃 ..... 🍂

No comments:

Post a Comment