सातारयातील हरवलेल्या रस्त्याची कथा सातारा नगरपरिषद ही महाराष्ट्रातील 'अ' प्रकारातील खूप जुनी नगरपरिषद आहे.याची स्थापना स्वातंत्र्योत्तर काळात १८५९ झालेली आहे.तरीसुद्धा पुण्या-मुंबईचे लोक सातारला एक मोठं खेडं असेच संबोधतात.कारण खालच्या आणि वरच्या रस्त्याच्या पलिकडे सातारयाचा कधीच विकास झाला नाही किंवा नवीन नेत्वृत्व निर्माण होईल या भितीने प्रस्थापितांनी होवू दिला नाही..अकलूजसारख्या आडरानी महामार्ग आणि लोहमार्ग यांपासून दूर असणाऱ्या गावाचा विकास होतो पण NH-4 या राष्ट्रीय महामार्गावरअसणाऱ्या सातारचा विकास म्हणावा तसा झाला नाही.कारण इथले राजकारण हे विकासापेक्षा vote bank खूश ठेवण्यात खर्ची पडले .त्यामुळेच शहराच्या विकास आराखड्याच्या नकाशात अंतर्गत भागात मोठेमोठे रस्ते दिसतात पण प्रत्यक्षात हे अत्यंत कमी लांबी रूंदीचे केलेले आहेत.काही ठिकाणी तर नगरसेवक व पालिका कर्मचारी व मुख्याधिकारी यांच्या आशिर्वादाने रस्तेच हरवले आहेत.
असाच एक हरवलेला रस्ता म्हणजे प्रभाग १०(वार्ड क्र.३८)मधील रस्ता .येथील मागासवर्गीय वस्तीत ९ मीटरचे तीन रस्ते आहेत पणा रिक्षासुद्धा जाऊ शकत नाही एवढे अतिक्रमण स्थानिकांनी केले आहे. सदरचे अतिक्रमण काढले तर vote bank जाईल आणि कारवाई केली तर नेत्यांचा फोन येईल म्हणून पालिका कर्मचारी घाबरतात आणि त्यामुळेच अनाधिकृत वस्तीतील लोक शिरजोर होतात आणि प्रशासनावर डोईजड होतात. मंगळवार पेठ येथे सातारा नगरपालिकेने सि.स.नं.४६७ दुबळे घर ते ४६१ वायदंडे घर या दरम्यान ठराव क्र.१६६९ दि.२९/३/२०११ नुसार ५०*८ मी.व६*८.१५ मी.लांबी रूंदीचा रस्ता मंजूर केला होता.नगरपालिकेने शिल्लक जागेतून रस्ता तयार करण्याचे ठरविले आणि अतिक्रमण करण्यारया लोकांना अभय मिळाले.पण त्यावेळी दुबळे कुटुंबातील लोकांनी मंजूर ठरावानुसारच रस्ता तयार करण्याविषयी विडा उचलला,कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावेल.त्यासाठी त्यांनी लोकशाही दिन,लोकायुक्त कार्यालयात,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रारी केल्या,सुनावण्या झाल्या.नगरपरिषद प्रशासनाने कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेली.पण या भांडणात मूळ रस्त्याचा प्रश्न बाजूलाच पडला.अतिक्रमणास निर्डावलेल्या लोकांनी पूर्ण रस्त्यावरच अतिक्रमण करून प्रशासनास ओपन चँलेज दिले.आज D.P.नकाशात दिसत असलेला ९ मी.चा रस्ता हरवला आहे.असे अनेक रस्ते सातारयात हरवले आहेत.त्याचा शोध कधी लागणार?नगरपरिषद प्रशासन आपला षंढपणा कधी सोडणार. नाहीतर 'नटसम्राट' मधील आप्पा बेळवणकरांच्या 'कुणी घर देता का घर'आर्त विणवणी सारखी 'कुणी रस्ता देता का घर' अशी अवस्था सातारकरांची अवस्था होईल.ग्रामीण भागातून आलेल्या पालकमंत्रांनी १५० वर्षापेक्षा जास्त जुन्या नगरपालिकेची गांधी मैदानावर 'सातारा शहरात साधी गटार योजना नाही'अशी इज्जत काढली.आता आणखी कोणी अंतर्गत रस्त्यावरून आणखी कोणी इज्जत काढणार नाही,याची काळजी सातारचे नेते घेतील काय?एक सातारकर (गणेश दुबळे )

No comments:
Post a Comment