Sunday, 18 October 2015

सातारा शहरात 'रावणराज'येणार काय?

         सातारा हे खरं तर एक ऐतिहासिक  शहर.मराठ्यांची राजधानी ,पत्रीसरकार,बाबासाहेबांचे वास्तव्य,कर्मवीरांची कर्मभूमी,पेन्शनर सिटी या नावांनी जग सातारला ओळखते.पश्चिम महाराष्ट्रातील इतर शहरांच्या मानाने सातारा शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.अलिकडेच शेवटच्या वर्षासाठी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांचे खांदेपालट झाले.नगराध्यक्ष पद आरक्षित असल्याने साविआच्या विजय बडेकर आणि बराच काळ डावललेले नविआचे जयवंत भोसले यांना मिळाले.सबंध महाराष्ट्रात दुष्काळ असताना इथे मात्र शुभेच्छांचा सुकाळ आहे.राज्यकर्त्यांनी संवेदना जागृत ठेवून भावनांवर नियंत्रण ठेवायला हवे होते.पण सातारा शहरात वर्चस्व वादातून अतिशय ओंगळवाणे,पर्यावरणाला हानिकारक असे  flex war खेळण्यात आले.वास्तविक हाच पैसा दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री निधीत जमा केला असता तर राज्याचे कल्याण झाले असते.शहरात तथाकथित समाजसेविकेच्या दबावाखाली प्लास्टिक बंदी झाली पण flex बंदी का होत नाही?का त्यांना याचे काही "कर्तव्य "नाही?                                  

पण नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर 'दहा तोंडाचा नगराध्यक्ष'हा flex लावून सातारयात आता 'रावणराज्याची' सुरुवात होणार आहे,असे तर सुचवायचे नाही ना?                                       देशात जरी लोकशाही असली तरी सातारकर जनता ही 'प्रजा' आहे,ती जेव्हा 'नागरिक' होईल तेव्हाच शहराचा विकास होईल..पाहूया 'प्रजा' कधी 'नागरिक'होते ते!

No comments:

Post a Comment