Thursday, 29 March 2018

सातारा नागरिक परिषद,सातारा : साताराकरांची भर उन्हाळ्यात उड्डाणपूलाची (flyover)ची तहान ग्रेड सेपरेटर वर भागली????

सातारा नागरिक परिषद,सातारा : साताराकरांची भर उन्हाळ्यात उड्डाणपूलाची (flyover)ची तहान ग्रेड सेपरेटर वर भागली????

साताराकरांची भर उन्हाळ्यात उड्डाणपूलाची (flyover)ची तहान ग्रेड सेपरेटर वर भागली????

पोवई नाका 

 सातारा :सातारा शहरातील वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी पोवई नाक्यावर उड्डाण पुल उभारण्याचा निर्णय आघाडी शासनाने घेतला होता. उड्डाणपूल मंजूरही झाला होता. मंजुरीला बराच काळ लोटला.अधूनमधून  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून  निविदा काढण्याचेच काम चालू होते.
  अचानक ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन हे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या हस्ते झाले.
     एवढी वर्षे उड्डाणपूलाचे स्वप्न पाहिलेल्या सर्वसामान्य सातारकरांना ग्रेडसेपरेटर ही भानगड काय आहे? हे कळायच्या आत ग्रेड सेपरेटरचे कामसुद्धा सुरु झाले .
 ग्रेड सेपरेटर ही वाहतूक  कोंडीवरील साधी उपाययोजना आहे.भविष्यात तेथेही कोंडी होऊ शकते.सातारा शहरात प्रचंड पाऊस पडतो.या भुयारी ग्रेडसेपरेटर मध्ये साचणारे पाणी बाहेर काढण्याची उपाययोजना आहे काय??
ग्रेडसेपरेटर हा अभियंत्त्याकडून वापरली जाणारी  तांत्रिक शब्द आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जेथे अनेक रस्ते एकत्र आल्याने वाहनांना वेगवेगळ्या दिशांना वळावे लागते परंतु सिंग्नल मुळे प्रवाशांना खूप वेळ थांबावे लागते,त्यासाठीच ग्रेड सेपरेटर मुळे रस्त्यांची उंची कमी अधिक केल्याने प्रवासाचा वेळ वाचतो.
ग्रेडसेपरेटर मध्ये उड्डाणपूल,भुयारी मार्ग,बोगदा,रेल्वे पूल याचा समावेश होतो.
त्यापेक्षा उड्डाणपूल ही वाहतूक कोंडीवरील वैशिष्ट्यपूर्ण व दीर्घकालीन उपाययोजना व शहराची   प्रगती दर्शवणारे उदाहरण आहे.
सर्व flyovers हे grade separators असतात पण सर्व grade separators हे flyovers असतीलच असं काही नाही.
आता पोवई नाक्यावर सातारकरांना उड्डाणपूल कधीच दिसणार नाही.
 स्वर्गीय विलासराव देशमुख  मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील पहिला उड्डाणपूल लातूर येथे झाला.
  प्रतिभादेवी पाटील राष्ट्रपती असताना अमरावती येथे उड्डाणपूल झाला.औरंगाबाद येथे क्रांती चौकात उड्डाणपूल आहे .
मात्र  आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण,मुख्यमंत्री (कराड)व अजित पवार(मूळ गाव-कोरेगांव) हे दोघेही सातारा जिल्ह्यातील असूनही सातारा  जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी मंजूर झालेला उड्डाणपूल का झाला नाही??
    सध्याचे मुख्यमंत्री उड्डाणपूलाऐवजी T&T कंपनीला ग्रेडसेपरेटरचे काम देतात ,
मग त्याच तत्परतेने सातारा शहराची हद्दवाढ व मेडिकल कॉलेज का मंजूर करत नाहीत ??
  असेच होत राहिले तर मोठ्या शहरांच्या तुलनेत सातारा शहराची प्रगती कशी होणार??
  असो .......
     वर्षानुवर्षे प्रगतीची वाट पाहणाऱ्या सातारकरांची उड्डाणपूलाची  तहान ग्रेडसेपरेटर वर भागवली हेही नसे थोडके.शेवटी विकासाची सुरुवात कुठून तरी होणे गरजेचे.राजकीय संदोपसुंदी व श्रेय वादामुळे शहराचा विकास ठप्प होऊ नये,एवढीच माफक अपेक्षा !!
धन्यवाद !
गणेश दुबळे सर,
लातूर उड्डाणपूल 
एक सातारकर.
औरंगाबाद उड्डाणपूल 

Sunday, 5 February 2017

मतदार यादीत नाव शोधा

आपले मतदार यादीतील नाव कुठल्या क्रमाकाला आहे हे माहीत नसते,मी एक खाली लिंक देत आहे,त्यावर नुसती टिचकी मारा,आपले नाव टाका,तुमचे नाव,यादी भाग क्रमांक,व क्रमांक येईल,edc फॉर्म भरा,आपला हक्क बजावा ,
103.23.150.139 https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=http://103.23.150.139/marathi/&ved=0ahUKEwil94Gkh_TRAhVIOI8KHVOiBxgQFggZMAA&usg=AFQjCNEkT7DB8COk02IaZlJEals-ESVx9w&sig2=f6NqSsB-elIYcTneQbJcgg