Saturday, 18 June 2016

लढाई अन्याय कारक घरपट्टी करवाढ विरोधात

*सातारा नगरपरिषद ही महाराष्ट्रातील 'अ' वर्ग प्रकारातील नगरपालिका आहे.नगरपालिकेत water,gutter,street light  आणि खड्डे मुक्त रस्ते ह्याच नागरिकांचे मुलभूत गरजा असतात*.आपण वेळेवर घरपट्टी भरल्यास आपल्याला किमान नागरी सुविधा मिळावयास हव्यात हीच नागरिकांची अपेक्षा असते.परंतु सातारयातील कर भरणारया  लोकांना किमान नागरी सुविधा मिळत नाहीत.जे लोक पाणीपट्टी भरतात,त्यांना पाणी मिळत नाही पण जे लोक झोपडपट्टीत राहतात,कोणताही कर भरत नाहीत किंवा नगरसेवकांचे बगलबच्चे असतात,त्यांना पाईप लाईन ला खालच्या बाजूने होल मारून नको तेवढे पाणी मिळते,जे लोक नियमाने कर भरतात,त्यांना एक महिना कर भरण्यास उशिर झाला की चक्र वाढ पद्धतीने व्याज आकारणी करून नोटीस पाठवली जाते, पण जे शासकीय जागेत राहतात ,त्याच लोकांचे गावी वाडे,तसेच एकरात जमीनी असतात, त्यांना नगरपालिका फुकटात घर देते, पार्किंग,फूटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे गाडी कुठं बाजूला लावली की पोलिसांनी गाडी नेली उचलून,त्यापेक्षा parking zone व parking buildings तयार करा ना? असो सातारा शहरातील सुधारित घरपट्टी वाढ ही अन्याय कारक आहे,आम्ही तुमच्या कारभारावर तसेच नागरी सुविधांवर समाधानी नाहीत ,त्यामुळेच कोणतेही करवाढ करू नये,          
   *लवकरच सातारा शहरातील नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी तसेच सुधारित घरपट्टी करवाढ रद्द करणेसाठी शिवांतिका सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ,सातारा आणि रिपब्लिकन एम्प्लाँईज फेडरेशनच्या वतीने निषेध मोर्चा तसेच घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे,तरी सातारा शहरातील ज्या पक्ष,सामाजिक संघटना ,नागरिक ,युवक यांना या आंदोलनात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संपर्क साधा-गणेश दुबळे सर 9326655211*

No comments:

Post a Comment