Sunday, 22 November 2015

मेरा नंबर कब आयेगा?

आवारातला प्रत्येक कर्मचारी डोक्यावर हेल्मेट लावूनच फिरू लागलेला. समोरून कुणी गबरू-गबरू 'मेंबर' येताना दिसला की लगेच घाबरून कोपर्‍यात कुठंतरी गायब होऊ लागलेला. याची कुणकुण लागताच बापटांचे अभिजित प्रचंड अस्वस्थ झालेले. 'असं झालं तर आपल्या अपरोक्ष काम कोण करणार?' याची चिंता त्यांना सतावू लागलेली; कारण महिन्यातून पाच दिवस मुंबईत, चार दिवस दिल्लीत, तीन दिवस भोपाळमध्ये अन् दोन दिवस सांगलीत असणार्‍या बापटांना 'पालिकेतील कर्मचारी गायब होणं' परवडण्यासारखं नव्हतं. 
त्यांनी तातडीनं केबिनमध्ये दोघा-तिघांना बोलाविलेलं. मात्र, गालाला रूमाल लावूनच सारे आले. बावचळून बापटांनी विचारलं, 'असं का?'.. तेव्हा एकजण थरथरत म्हणाला, 'साहेब. कितीही केलं तरी तुम्ही बाहेरचे. तुम्हाला इथल्या काही मेहरबान लोकांच्या करामती माहीत नाहीत. जनतेची सेवा करण्यासाठी लोकांनी त्यांना निवडून दिलं; मात्र जणू जनतेवर मेहरबानी करण्यासाठीच दोन्ही राजेंनी त्यांना इथं पाठविलंय, असा त्यांच्यातल्या काही जणांचा भ्रम झालाय. त्यामुळं त्यांचा हात अन् आमचा गाल एक होऊ नये, याची आजकाल आम्ही काळजी घेतोय.' 
हे ऐकताच टरकलेले बापट पुन्हा मुंबईला निघाले. एवढय़ात, प्रवेशद्वाराजवळ दोन-तीन ठेकेदारही त्यांना भेटले. त्यांनी तर डोक्यावर चक्क शिरस्त्राण चढवलं होतं. बापटांय् forward by सचिन जवळकोटेdaily lokmat,satara

No comments:

Post a Comment