शहीद कर्नल संतोष घोरपडे यांच्याविषयी आमचे मित्र सुनिल शेडगे यांनी लिहिलेला लेख-
सुनील शेडगे/ सकाळ वृत्तसेवा
नागठाणे, ता. १९ : गेले दोन दिवस 'सोशल मीडिया'ला जणू कर्नल संतोष महाडिक या नावाची भुरळ पडली होती. आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कित्येकांना आठवण झाली ती त्यांच्या व्हॉट्स अॅपवरच्या 'डिस्प्ले फोटो'ची. त्यातल्या पत्नी अन् त्यांच्या मुलांच्या हास्याला जणू दृष्टच लागली.
संतोष महाडिक यांच्या पार्थिवाला आज विशाल जनसमुदायाच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला. गेले दोन दिवस सोशल मीडियावर कर्नल संतोष महाडिक यांच्यावरच्या बातम्या वाचावयास मिळत होत्या. त्यांच्या मित्रपरिवाराकडू न विविध प्रकारचे फोटोही 'शेअर' केले जात होते. त्यातला महाडिक यांचा व्हॉट्स अॅपवरचा 'डिस्प्ले फोटो' विशेष लक्षात राहणारा होता. त्यात त्यांच्या पत्नी स्वाती, मुलगी कार्तिकी, मुलगा स्वराज यांचे 'क्लोज अप' दिसतात. तिघांच्याही चेह-यावर निरागस, दिलखुलास, खळाळते हास्य दिसते आहे. या तिघांच्याही जीवनातला हा विलक्षण आनंदाचा क्षण. संतोष यांच्या कायमच्या जाण्याने जणू या आनंदाला, हसण्याला दृष्ट लागली. आज अंत्यसंस्कारापू र्वी पत्नीने फोडलेला हंबरडा, मुलांचा आकांत, त्यांचे व्याकुळ चेहरे उपस्थितांना गलबलून सोडत होते.
संतोष यांच्या अकाउंटचे 'स्टेट्स'ही लक्षात राहणारे होते. 12 इयर्स ऑफ ब्लीसफुल टुगेदरनेस. थँक यू डिअर फॉर बीईंग विथ
मी...
संतोष अन् स्वाती यांच्या विवाहाला अलिकडेच बारा वर्षे पूर्ण झाली होती. चार जुलै ही त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसाची तारीख. त्याचाच संदर्भ त्यांच्या 'स्टेटस'मध्ये होता. आता संतोष हे जग सोडून, आपल्या कुटुंबीयांना सोडून गेले आहेत खरे. मात्र कित्येक आठवणी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी मागे ठेवल्या हे नक्की.
सुनील शेडगे/ सकाळ वृत्तसेवा
नागठाणे, ता. १९ : गेले दोन दिवस 'सोशल मीडिया'ला जणू कर्नल संतोष महाडिक या नावाची भुरळ पडली होती. आज दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी कित्येकांना आठवण झाली ती त्यांच्या व्हॉट्स अॅपवरच्या 'डिस्प्ले फोटो'ची. त्यातल्या पत्नी अन् त्यांच्या मुलांच्या हास्याला जणू दृष्टच लागली.
संतोष महाडिक यांच्या पार्थिवाला आज विशाल जनसमुदायाच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला. गेले दोन दिवस सोशल मीडियावर कर्नल संतोष महाडिक यांच्यावरच्या बातम्या वाचावयास मिळत होत्या. त्यांच्या मित्रपरिवाराकडू
संतोष यांच्या अकाउंटचे 'स्टेट्स'ही लक्षात राहणारे होते. 12 इयर्स ऑफ ब्लीसफुल टुगेदरनेस. थँक यू डिअर फॉर बीईंग विथ
मी...
संतोष अन् स्वाती यांच्या विवाहाला अलिकडेच बारा वर्षे पूर्ण झाली होती. चार जुलै ही त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसाची तारीख. त्याचाच संदर्भ त्यांच्या 'स्टेटस'मध्ये होता. आता संतोष हे जग सोडून, आपल्या कुटुंबीयांना सोडून गेले आहेत खरे. मात्र कित्येक आठवणी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी मागे ठेवल्या हे नक्की.

No comments:
Post a Comment