सध्या सातारयात जिल्हाधिकारी साहेब आश्विनीकुमार मुदगल यांनी धाडसाने पाँवर हाऊस येथील अनाधिकृत झोपडपट्टीवर केलेल्या कारवाईची चर्चा आहे.यांमध्ये तरुण भारत या दैनिकाने सातत्याने आवाज उठवला त्यांचे श्रेयदेखील दुर्लक्षून चालणार नाही .सातारकरांच्या वतीने जिल्हाधिकारी ,प्रांत,तहसिलदार,त्यांचे सर्व सहकारी आणि दैनिक तरुण भारत यांचे जाहीर हार्दिक अभिनंदन ! वास्तविक आपल्या कासचा समावेश जागतिक पर्यटन स्थळांत केलेला आहे.जगभरातून पर्यटक सातारामार्गे कासला जातात.त्यांचे स्वागत बोगदा परिसरात झोपडपट्टीने होते,ही आम्हा सातारकरांच्या दृष्टीने शरमेची बाब आहे.हा परिसर green zone मधील आहे,असे असूनही ही झोपडपट्टी वाढते म्हणजे येथील स्थानिक नेत्यांचा छुपा पाठिंबा आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. आम्ही पूर्वी या टेकडीवर खेळायला जायचो,पतंग उडवायचो पण काही वर्षापासून फुटकळ दादांनी डोंगराचा कमी किंमतीत विकण्याचा sale सुरू केला आणि vote bank तयार झाल्याने राज्यकर्त्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले.खरं या टेकड्या सातारकरांच्या मोकळा श्वास घेण्याची हक्काची जागा आहे तरी सातारकरांना विनंती आहे की सर्वजण मिळून आपल्या सभोवतालच्या टेकड्या वाचवूया!
No comments:
Post a Comment