Monday, 21 September 2015

अजिंक्यतारा

 सातारा शहराच्या दक्षिणेला असलेला मोठा किल्ला म्हणून अजिंक्यतारा हा किल्ला ओळखला जातो.अजिंक्यतारा,अजिमतारा किंवा मंगळाईचा डोंगर या नावानेही तो ओळखला जातो.पूर्वी या किल्ल्यावरून शहर व सभोवतालच्या विस्तीर्ण प्रदेशावर देखरेख करीत असत. या किल्ल्याच्या उतारावर शहराचा बराचसा भाग वसला आहे.अजिंक्यतारा शिलाहारवंशीय राजा दुसरा भोज याने ११९० मध्ये बांधला.१६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.१६९८मध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी सातारा ही मराठी राज्याची राजधानी जाहीर केली.

No comments:

Post a Comment